ई-श्रम कार्डच्या माध्यमातून कामगारांनी भारत सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा : खा. अशोक नेते

96

गडचिरोली : देशात श्रम करना-या कामगाराना लाभ देण्याकरिता पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांंनी अनेक योजना आनल्या आहेत. अश्या ई-श्रम कार्डच्या माध्यमातून कामगाराना भारत सरकारच्या योजनांंचा लाभ घेण्यात अडचण येनार नाही. कामगारानी भारत सरकारच्या योजनांंचा लाभ घ्यावा, असे आवाहन खा. अशोकजी नेते राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा यानी केले. चामोर्शी गोंडमोहला येथे ई – श्रम कार्ड वितरण कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून आवाहन केले. चामोर्शी येथील 100 महिला कामगारांंना अगरबत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार मिळत असलेल्या अगरबत्ती प्रकल्पाची पाहनी करून समाधान व्यक्त केले व हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
मंचावर प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र, श्री स्वप्निल जी वरघंटे प्रदेश सदस्य भाजयुमो महाराष्ट्र, श्री रमेशजी बारसागडे, कृषी सभापती जि.प.गडचिरोली, श्री दिलीपजी चलाख भाजपा ता.अध्यक्ष चामोर्शी, श्री चरडुके, श्री दिलीपजी बारसागडे. प्रकल्पाचे संचालक श्री आशिष पिपरे उपस्थित होते.