दंगली विरोधात लावलेले भाजपा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या : जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे

65

– जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन

– जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना पाठवले मागण्यांचे निवेदन

गडचिरोली : त्रिपुरात कोणतीही अनुचित घटना घडलेली नसताना कुठल्या तरी देशात मज्जिद पाडल्याचा जुना व्हिडिओ दाखवून व केवळ अफवा पसरवून अमरावती, नांदेड व मालेगाव येथे नियोजनबद्ध पद्धतीने दंगल घडवून आणण्यात आली. हजारोंच्या संख्येने जमाव एकत्र येऊन व शस्त्र हातात घेवून सर्वसामान्य लोकांच्या दुकानांची वाहनांची तोडफोड केली. माञ त्यांंच्यावर कारवाई न करता स्वरक्षणासाठी दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरलेल्या लोकांवर दंगल घडवून आणली म्हणून खोटे गुन्हे दाखल केले. यात कोणत्याही एका पक्षाचे लोक नसताना केवळ जाणीवपूर्वक भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांवरील लावण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे व या घटनेची सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त नायायाधिशामार्फत चौकशी करण्यात यावी याकरिता भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनामध्ये भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती रंजीताताई कोडापे, महिला व बालविकास सभापती रोशनीताई पारधी, अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश महामंत्री प्रकाशजी गेडाम, ओबीसी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुनीलजी पारधी, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, धानोरा तालुका प्रभारी अनिल पोहनकर, नगरसेवक केशवजी निंबोळ नगरसेविका अल्काताई पोहनकर, नगरसेविका वैष्णवीताई नैताम, नगरसेविका लताताई लाटकर, भाजपा पदाधिकारी अनिल करपे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा महामंत्री जनार्दन साखरे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, राजू शेरकी, देवाजी लाटकर, विलास नैताम, राकेश राचमलवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन पाठवले. या निवेदनामध्ये त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत झाली पाहिजे, ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक केली पाहिजे, दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे, स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी,
भारतीय जनता पार्टीच्या नेते – कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यांचा अशी समावेश आहे.