कोरची येथे खा. अशोक नेते यांच्या हस्ते एकलव्य आदर्श निवासी विद्यालय इमारतीचे भूमिपूजन

122

– देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ई-भूमिपूजन

गडचिरोली : देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते15 नोव्हेंबर 2021 रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आदिवासी गौरव दिनानिमित्त देशातील 700 एकलव्य आदर्श निवासी विद्यालय इमारतीचे भूमिपूजन भोपाळ येथून ऑनलाईन करण्यात आले. कोरची येथे एकलव्य आदर्श निवासी विद्यालय इमारतीचे भूमिपूजन गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा महामंत्री आनंद चौबे, तालुका महामंत्री नंदुभाऊ पंजवानी, कोरची नगर पंचायतचे उपाध्यक्ष कमलनारायण खंडेलवाल, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुधाकर गौरकर, भ्रष्ट्राचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल, जि. प. सदस्य अनिलजी केरामी, महादेव बन्सोड, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक भारत पंधरे उपस्थित होते. खासदार अशोक नेते यांनी केंद्र शासनाकडे सतत पाठपुरावा करून गडचिरोली जिल्ह्यात 4 एकलव्य विद्यालय मंजूर करून घेतले. हे विद्यालय बोटेकसा (ता. कोरची), धानोरा, एटापल्ली, लाहेरी (ता. भामरागड) येथे सुरू होणार आहेत व नवोदय विद्यालयासारखे उच्च दर्जाचे शिक्षण जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य निवासी विद्यालयाच्या माध्यमातून मिळणार आहे.