– मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने दिला निवेदन
– स्थानिक इंदिरा गांधी चौकात आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत केले आंदोलन
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विरोधात १२ नोव्हेंबरला तीव्र आंदोलन व निदर्शने करण्यात आले. स्थानिक इंदिरा गांधी चौकात आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले. मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने निवेदन दिले. या आंदोलनात आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, नगरसेवक रमेश भुरसे, भाजपा शहर महामंत्री मुक्तेश्वर काटवे, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भारत खटी, पं. स. उपसभापती विलास दशमुखे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष चांगदेव फायदे, विनोद देवोजवार, नगरसेवक केशव निंबोड, वैष्णवी नैताम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.