– एस. टी. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला दर्शविला पाठिंबा
गडचिरोली : राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, एस. टी. कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन व भत्ते मिळावे, दिवाळीपूर्वी वेतनाची थकबाकी मिळावी इत्यादी मागण्या घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात एस. टी. कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारलेला आहे. शहरातील एस. टी. आगारात आज नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी भेट दिली व एस.टी.कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच बेमुदत संपाला पाठिंबा दर्शविला. एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असुन महाविकास आघाडी सरकारने राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी नगराध्यक्ष यांनी केली. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, पंचायत समिती उपसभापती विलासराव दशमुखे, भाजपा जेष्ट कार्यकर्त्या प्रतिभाताई चौधरी, भाजपा तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे उपस्थित होते. तसेच रा. प. कर्मचारी समाधान मार्कंडे, सुनील पेचकोळ, अंकुश केंद्रे, राजीव जुमडे, महेश जौनजाळकर, महेश बहिरेवार, मानिराम कुलमेटि, संतोष चलाख, नारायण फड, राजरत्न पेटकर, गौतम गेडाम, भाष्कर आत्राम व जवळपास चारशे कर्मचारी उपस्थित होते.