गडचिरोली : प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने शेतकऱ्यांना टेरी तारांचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात वनाचे क्षेत्र अधिक असल्याने प्राण्यांचा वावर असतो व त्या प्राण्यांपासून पिकांचे नुकसान होते. त्यामुळे काटेरी तारांचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.