वंजारी समाजातर्फे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

113

गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : वंजारी समाज जिल्हा गडचिरोलीच्या वतीने स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंजारी समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भडांगे होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, राकाॅंचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी नगराध्यक्ष प्रमोद वैद्य, माजी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक, काॅंग्रेस नेते हसन गिलानी, विजय साळवे, निखिल गोरे, नरेश कहुरके आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जयंती निमित्ताने दिवसभरात स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या नावाने चौकाचे अनावरण, स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या मार्गाचे अनावरण, रक्तदान शिबिर, रक्तगट तपासणी शिबिर, कोविड लसीकरण आदी कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील नागरिक, समाज बांधव व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.