Home गडचिरोली स्नेहसंम्मेलनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कलागुणांचा अविष्कार घडते : खा. अशोक नेते

स्नेहसंम्मेलनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कलागुणांचा अविष्कार घडते : खा. अशोक नेते

140

– हिंदू ज्ञान मंदिर ब्रम्हपुरी येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

ब्रम्हपुरी : विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये जगत असताना दूरदृष्टी, लगन, चिकाटी, जिद्द, सहनशीलता गुण अंगीकारले पाहिजे व आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी दूरदृष्टीने अभ्यास केला पाहिजे. कोणतेही कार्य करताना जिद्दीने, चिकाटीने, आत्मविश्वास ठेऊन कार्य केले पाहिजे. कुठलाही वाद-विवाद न करता शांत चित्ताने पार पाडावे व सहनशीलता जोपासावी. विद्यार्थ्यांना कला, कौशल्ये, विकसित व्हावा, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा. यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कलागुणांचा अविष्कार घडते, असे प्रतिपादन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे‌ राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी केले.

विद्यार्थांच्या कला गुणांना सर्वांगीण वाव मिळावा. यासाठी सतत पस्तीस वर्षापासून भारतीय हिंदु संस्कृतीचे मार्गदर्शन, सातत्याने शंभर टक्के निकाल ब्रम्हपुरी क्षेत्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था सामाजिक विविध स्तरावरील मान्यवरांचे मार्गदर्शन व संस्थेचे सातत्याने सहकार्य यामुळे छोटयाशा रोपट्याचे कल्पवृक्षात रूपांतर, शिक्षणाबरोबरच अध्यात्मिकाचे ज्ञान, चांगले संस्कार, कलागुण, सामाजिक कार्याचे धडे असे उपक्रम या एकात्मता शिक्षण संस्थेच्या हिंदु ज्ञान मंदिर ब्रम्हपुरी येथे दिले जाते. याबरोबरच विदयार्थीचे कला कौशल्ये विकसित करण्यासाठी स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून खा. नेते बोलत होते.

याप्रसंगी प्रामुख्याने मंचावर नागपुर विभागाचे प्रांत कार्यवाहक अतुलजी मोघे, एकात्मता शि. संस्थाचे अध्यक्ष अरून काहारे, माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर, गटशिक्षणाधिकारी पं. स. चे माणिक खुणे, सचिव प्रभिर चौरिकर, सदस्य नारायण बोकडे, प्राचार्य अंजूम सय्यद, संजय खरवडे, साकेत भानारकर, विशाल चौके, प्रा. प्रकाश बगमारे, नकुल मेहर, आदिती वानखेडे, सिया पटेल, राधिकाताई जाती, फकीराजी कुर्वे, तसेच हिंदू ज्ञान मंदिराचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!