Home गडचिरोली भगवान बिरसा मुंडा व शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याची उभारणी करण्याचे...

भगवान बिरसा मुंडा व शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याची उभारणी करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार : आमदार डॉ. देवरावजी होळी

140

– रायपूर येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीच्या कामाचे केले भूमिपूजन

– भगवान बिरसा मुंडा वाचनालयाचे रायपुरात केले उद्घाटन

– भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून रायपुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेले क्रांतीसूूर्य भगवान बिरसा मुंडा व शहीद वीर बाबुरावजी शेडमाके यांचे स्मारक आपल्या गावी असावे असे स्वप्न आपण बाळगले होते. त्या स्वप्नाची पूर्तता आता होत असून आपले वडील स्वर्गीय मादगुजी चैतुजी होळी, मोठे भाऊ साधूजी मादगुजी होळी व वहिनी सौ. मंजुळा देवी साधूजी होळी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लवकरच रायपूर येथे भगवान बिरसा मुंडा व वीर शहीद बाबुरावजी शेडमाके यांचा पुर्णाकृती पुतळा उभा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी या पुर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीच्या भूमिपूजनप्रसंगी केले.

यावेळी गडचिरोली भाजपाचे तालुका अध्यक्ष रामरतनजी गोहणे, चामोर्शीचे अध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडीचे अध्यक्ष सुरेश शहा, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, कारवाफ्याचे डॉक्टर चौधरी, रायपूर ग्रामसभेचे सुभाष वेळदा, अरविंद उईके, पदा, खोब्रागडे यांच्यासह परिसरातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आपले वडील, मोठे बंधू व वहिनी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भगवान बिरसा मुंडा वाचनालयाचेही उद्घाटन केले. परिसरातील आदिवासी व गैरआदिवासी विद्यार्थ्यांना या वाचनालयाचा उपयोग व्हावा यासाठी त्यांनी या वाचनालयाचेही उद्घाटन केले.

भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुरावजी शेडमाके हे आदिवासी समाजाचे दैवत असून त्यांच्या कार्याची प्रेरणा भविष्यातील आपल्या पिढीला कायमस्वरूपात मिळत राहावी, त्यांची प्रतिमा आपल्यासमोर नियमित उभी राहावी याकरिता आपण आपल्या जन्मगावी रायपूर येथे भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुरावजी शेडमाके यांचे स्मारक व्हावे असे स्वप्न बाळगले होते. आता ते लवकरच पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन या भूमिपूजनप्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले.

error: Content is protected !!