गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना स्व. डॉ. एस. एस. गडकरी स्मृती पुरस्कार जाहीर

216

– गडचिरोली पोलीस दलाच्या दादारोला खिडकीच्या माध्यमातून अनेक खेड्यातील लोकांच्या मदत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या कार्याची दखल घेवून नुकताच राष्ट्रीय स्तरावरील ‘HIPA’ (Indian Institute of public Administration) भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने देण्यात येणारा लोकप्रशासन २०२१ २०२२ मधील नवोपक्रमासाठीचा “स्व. डॉ. एस. एस. गडकरी स्मृती पुरस्कार पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांना जाहिर करण्यात आला. सदरचा पुरस्कार मंत्रालयातील समिती कक्ष येथे भारतीय लोक प्रशासन संस्थेची महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या दरम्यान हा पुरस्कार जाहिर करण्यात आला.

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीतर्फे पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ‘IIPA’ चा भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने देण्यात येणारा लोकप्रशासन २०२१-२०२२ मधील नवोपक्रमासाठीचा “स्व. डॉ. एस. एस. गडकरी स्मृती पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर मागास घटकांसाठी उत्कृष्ठ काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींसाठी दिला जातो.

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील वृध्द, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती, आत्मसमर्पीत नक्षलपिडीत तसेच आदिवासी नागरिकांच्या विकासाबाबत गांभिर्याने विचार करून गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती शाखेंतर्गत पोस्टे/उपपोस्टे व पोमकेंच्या ५३ ठिकाणी ‘पोलीस दादालोरा खिडकी’ सुरू केल्या आहेत. या पोलीस दादालोरा खिडकीमधून एकाच ठिकाणी नागरिकांना १) प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र २) प्रोजेक्ट विकास अंतर्गत विविध प्रकारच्या योजना ३) विविध प्रकारचे दाखले ४) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ५) व्होकेशनल ट्रेनिंग व रोजगार योजना ६ ) अग्निवीर ऑनलाईन अर्ज ७) प्रोजेक्ट कृषी समृध्दी ८) प्रोजेक्ट शक्ती तसेच शासनाचे इतर विविध उपक्रमाच्या माध्यमातून दोन लाखांचेवर दुर्गम व नक्षलग्रस्त भागापर्यंत पोहचून विविध योजनेचा लाभ मिळवून दिला आहे व विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन २,२६,१९० नागरिकांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळालेला असून, प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र – ९,३९० प्रोजेक्ट विकास अंतर्गत विविध प्रकारच्या योजना- ५८,८३१ विविध प्रकारचे दाखले १, २६, ४४८ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना- १७०, व्होकेशनल ट्रेनिंग व रोजगार योजना- ६,२१८, अग्निवीर ऑनलाईन अर्ज १७३, प्रोजेक्ट कृषी समृध्दी- १२, ९१८, प्रोजेक्ट शक्ती- १,६८६ व इतर उपक्रम- १०,५२५ अशाप्रकारचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यात आला आहे.