उपसभापती विलास दशमुखे यांच्या स्थानिक निधीतील कामांचे आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन

103

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली पंचायत समितीचे उपसभापती यांच्या स्थानिक 15 वित्त आयोग निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसभापती विलास केशवराव दशमुखे, तालुकाध्यक्ष तथा पं. स. सदस्य रामरतन गोहणे, पोरला ग्रामपंचायत सदस्य मुखरुजी लाडवे, तंटामुक्ती अध्यक्ष भाष्कर मेक्षाम, मनोज किरमिरे, चुरचुरा ग्रामपंचायत सरपंच प्रमोद चुधरी, डोमाजी पा. चुधरी, अनिल शेडमाके, पुंडलिक अलाम, रविसागर चुधरी, दत्तु माकोडे, सचिन राऊत, विलास चौधरी, ग्रामसेवक मनोहर बांबोळे, संजय म्हशाखेत्री, नगरीचेे सरपंच नागेश्वरी तिवाडे, अनुबाई वाघरे, भूमिका बारसागडे, विनोद पा. म्हशाखेत्री, राजू नैताम, भोलानाथ वाकुडकर, दादाजी संग्रामे, थुंडेशिवणीचे सरपंच भावना फुलझले, सुरेश पा. रंधये, रविंद्र रंधये, राजू मुरतेली, खुशाल चुधरी, श्रीधर शेजारे, जास्वंदा मडावी, श्यामराव चुधरी, तुकाराम फुलझले, रत्नाकर रंधये आदी उपस्थितीत होते.
यावेळी पोरला येथे अंगणवाडी शौचालय बांधकाम, कुराडी येथे सिमेंट रस्ता बांधकाम, धुंडेशिवणी येथे जि. प. शाळेचे किचन शेभ दुरुस्ती आदी 7 लक्ष रुपयांंच्याा कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी आ. होळी यांनी विलास दशमुखे यांनी आपल्या कार्यकाळात सर्वाांना सोबत घेवुन तालुक्यात विकास करीत आहेत. 15 वित्त आयोगाच्या निधीसाठी खुप मेहनत घेतली व आंदोलन केली. त्याचेच फलीत म्हणुन पं. स. सदस्यांना निधी मिळाला. सदर निधीतून आज ही विकासकामे होत आहेत, असे प्रतिपादन आ. डॉ. होळी यांनी केले.