राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे गडचिरोली जिल्हा शिवसेनेच्या वतीने स्वागत

122

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषधी प्रशासन, वस्त्र उद्योग व सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त गडचिरोली येथे आगमन झाले असता प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांचे गडचिरोली जिल्हा शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद कत्रटवार, यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके, संजय बोबाटे, संदीप भुरसे, संदीप अलबनकर, स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे, गुणवंत खोब्रागडे, विलास दाजगाये, रोमंजी भांडेकर, स्वप्निल धोडरे, रामदास बहायल, चंदबा दाजगाये, प्रभाकर चांग, नेपाल लोहबरे, निरंजन लोहबरे, हरबाजी दाजगाये, सूरज उइके यासह शिवसैनिक उपस्थित होते.