Home गडचिरोली अमेय सावकार पोरेड्डीवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अमेय सावकार पोरेड्डीवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

10

– कठाणी नदीघाटावर उद्या अंत्यसंस्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहराचे पहिले नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांचे सुपुत्र अमेय सुरेश सावकार पोरेड्डीवार (वय ३७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी १०.३० वाजता गडचिरोली शहरानजीकच्या कठाणी नदीवरील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यापूर्वी त्यांच्या निवासस्थान असलेल्या सावकार वाड्यातून सकाळी १० वाजता अंतिमयात्रा निघणार आहे.

अमेय सावकार यांच्या अकाली निधनामुळे गडचिरोली शहरात हळहळ व्यक्त होत असून विविध सामाजिक, राजकीय, व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने सावकार पोरेड्डीवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण शहर शोकमग्न झाले आहे.

error: Content is protected !!