Home गडचिरोली भ्रष्टाचारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कारवाईसाठी बुधवारला साखरवाडे यांच्या प्रतिमेला जुते –...

भ्रष्टाचारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कारवाईसाठी बुधवारला साखरवाडे यांच्या प्रतिमेला जुते – चप्पल मारो आंदोलन

16

– आंदोलनात सहभागी होण्याचे अरविंदभाऊ कात्रटवार व मित्रपरिवाराचे आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे व त्यांची गडचिरोली जिल्ह्यातून हक्कालपट्टी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात बुधवार, 17 जून 2026 रोजी दुपारी ३ वाजता लांजेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 च्या कार्यालयासमोर अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या प्रतिमेला जुते – चप्पल मारो आंदोलन करण्यात येणार आहे  आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अरविंदभाऊ कात्रटवार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

अरविंदभाऊ कात्रटवार यांनी स्पष्ट केले आहे की, कार्यकारी अभियंता  साखरवाडे यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात आणून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 25 मे 2026 रोजी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालया समोर डफरे बजाओ आंदोलन, 3 जून 2026 रोजी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर अभियंता साखरवाडे यांची ‘प्रतिकात्मक प्रेतयात्रा आंदोलन तसेच 9 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची नुकतीच भेट घेऊन लक्ष वेधले. ना. जयस्वाल यांच्यासमोर अभियंता साखरवाडे यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा  वाचला. एक अधिकारी तब्बल ८ वर्षापासून एकाच विभागात ठाण मांडून कसा का बसू शकतो ? असा सवालही अरविंदभाऊ कात्रटवार यांनी उपस्थित केला आहे. झोपी गेलेल्या शासकीय यंत्रणेला अद्यापही जाग आलेली नाही. त्यामुळे आता भ्रष्टाचारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन करण्यात येणार असल्याचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी स्पष्ट केले आहे.

कोरची तालुक्यातील नाडेकल बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवर  बांधण्यात आलेला पुल रहदारी सुरू होण्यापुर्वी कोसळला. या पुल बांधकामाची पाहणी केली असता पुलाचे निकृष्ट काम करून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या प्रकरणात दोषींवर फौजदारी कारवाई करून शासकीय रक्कमेची वसुली करण्यात यावी, 2025 – 26 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्ती व पुल दुरूस्तीच्या 50 कोटीच्या कामात भ्रष्टाचार करण्यात आला असून कामे न करताच बिले काढण्यात आली आहे. तसेच मागील 3 वर्षात तब्बल 5 हजार कामांच्या निविदा नियमबाह्यरित्या काढण्यात आल्या असून सदर कामे  कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांनी केवळ मजूर सहकारी सहकारी संस्थांना 20 टक्क्याने विकण्यात आल्याचा आरोपही कात्रटवार यांनी केला आहे.

कार्यकारी अभियंता श्री सुरेश साखरवाडे यांचे कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी चांगले वर्तन नाही. साखरवाडे हे कंत्राटदार व कार्यालयात उपस्थित असलेल्या इतर व्यक्तीसमोर महिला कर्मचाऱ्यांना दुहेरी; लज्जास्पदद्ध शब्दात बोलतात. शासकीय कार्यालयात वरिष्ठांकडून महिला कर्मचाऱ्यांना असभ्य वागणूक देणे हा गुन्हा आहे. या प्रकरणाची एकादया महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी करण्याची मागणी अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केली आहे.

गडचिरोली जिल्हयात रस्ते व पुलाची निकृष्ट कामे करून भ्रष्टाचाराचा कळस गाठणारे अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे, त्यांची गडचिरोली जिल्ह्यातून हक्कालपटी करण्यात यावी, नाडेकल येथील कोसळलेल्या निकृष्ट पुल बांधकाम प्रकरणाची उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, शासकीय निधीची वसुली करण्यात यावी या मागणीसाठी बुधवार, 17 जून 2026 रोजी दुपारी ३ वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 च्या कार्यालय समोर अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या प्रतिमेला जुते – चप्पल मारो आंदोलन करण्यात येणार आहे  कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिला आहे.

error: Content is protected !!