Home गडचिरोली कोरोना भत्त्याच्या नावाखाली अंगणवाडी महिलांची फसवणूक : प्रा. रमेशचंद्र दहिवडे

कोरोना भत्त्याच्या नावाखाली अंगणवाडी महिलांची फसवणूक : प्रा. रमेशचंद्र दहिवडे

42

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अंगणवाडी महिलांची मीटिंग छाया रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे व अरुण भेलके उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात अरुण भेलके म्हणाले, शासनाच्या वतीने निरनिराळी पत्रके काढण्यात आली आणि त्यात त्यांनी आवर्जून उल्लेख केला की, जीवाची पर्वा न करता कोरोना काळात अंगणवाडी महिलांनी तसेच आशा वर्कर ने काम केले. या कामाबाबत प्रतिमहा एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल, असे सांगून त्यांच्याकडून चोवीस महिने काम करून घेण्यात आले आणि फक्त एक महिन्याचा एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात आला. 23 हजार रुपये बाकी आहेत.

प्रा. दहिवडे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात तीन हजार सहाशे अंगणवाडी सेविका व मदतनीस आहेत.थकीत 23 हजार रुपये प्रमाणे अंगणवाडी महिलांचे 11 कोटी 52 लाख रुपये बाकी आहे. पाच वर्षाचे सामान्य व्याज जरी पकडले तरी त्या व्याजाची रक्कम पाच कोटीपेक्षा जास्त होते. अंगणवाडी महिलांना कोरोना भत्ता देण्यात यावा, असे पत्र मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी तीनवेळा काढले व गटविकास अधिकाऱ्यांकडे कोरोना भत्ता देण्याची जबाबदारी देण्यात आली. जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण यांनी देखील चारवेळा पत्र काढले. परंतु थकीत कोरोना भत्ता अजूनपर्यंत मिळाला नाही.

थकीत कोरोना भत्ता मिळावा, शासनाने फसवेगिरी बंद करावी, या मागणीला घेऊन 13 एप्रिलला ठीक दुपारी 12 वाजता गडचिरोली जिल्हा परिषदसमोर धरणा कार्यक्रम होईल. अंगणवाडी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली आहे, अशी माहिती अमोल मारकवार यांनी दिली.

error: Content is protected !!