– राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांची मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यात राज्य सरकारचे जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे महान कार्य सुरू आहे. परंतु जिल्ह्यातील विविध तालुक्यात जिल्हा परिषद शाळेचे इमारत मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेले आहे व अनेक शाळेचे इमारती नीरलेखन साठी तयार आहेत. परंतु त्याकडे कुणाचेच लक्ष नाही. शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व शाळेत शिक्षण देणाऱ्या गुरुजनांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे व द्यावे लागत आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेवर खूप मोठा प्रश्न निर्माण होऊन बसलेला आहे.
चामोर्शी तालुक्यातील चापलवाडा येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी स्वतः सदिच्छा भेट दिली. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था बाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांना चापलवाडा येथील जिल्हा परिषद शाळा अखेरची घटका मोजत असलेले दिसून आली व येथील समग्र शिक्षण व्यवस्थेचा बारा वाजलेला दिसून आला. येथील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेताना दिसून आले येथील शाळा संपूर्णपणे मोडकळीस आलेली आहे.

याबाबत शालेय व्यवस्थापन समितीने वारंवार सूचना देऊन सुद्धा अजूनपर्यंत याकडे दुर्लक्ष करण्यात आलेला आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यात अनेक शाळांची अशीच दूरावस्था आहे असे निदर्शनास आले.
यावेळी बोलताना डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी सांगितले, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या व्यवस्थेकडे प्राधान्याने लक्ष द्यावे व विविध तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नवीनीकरण कसे करता येईल व नवीन शाळा बांधण्याकरिता काय उपाययोजना करता येईल याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली व गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मोडकडीस आलेल्या शाळा व जीर्ण झालेल्याशाळा याबाबत परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी तत्काळ सदर समस्या मार्गी लावावे अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी व येथील सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच रमेश लेकलवार, सत्यवान तंटकवार, राजू सातपुते व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







