Home गडचिरोली चामोर्शी येथे श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन

चामोर्शी येथे श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन

46

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी येथे श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी कथावाचक पं. विनोद बिहारी गोस्वामी महाराज यांनी कार्तिक स्वामी धाम, हरणघाट येथे भेट देऊन धर्मभाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी श्री मुरलीधर महाराज यांची गळाभेट घेत समाधान व्यक्त केले व विविध आध्यात्मिक विषयांवर सखोल चर्चा केली.

याप्रसंगी माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद खोबे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भाविकांनीही गोस्वामी महाराजांच्या सहवासाचा लाभ घेत आशीर्वाद प्राप्त केला.

यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपस्थित नागरिकांना चामोर्शी येथे सुरु असलेल्या श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहास पुढील दिवसांच्या कथा कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!