– मेळाव्याला कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन आज, 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता चामोर्शी बसस्टॉप समोर चामोर्शी रोड गडचिरोली येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार ॲड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) ह्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी निवडणुकांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यात पक्ष संघटन, आगामी निवडणुका व विविध विकास कामांवर भाजपा नेते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.







