संस्थापक अरुण हरडे यांच्या हस्ते डॉ. पवन नाईक यांचा सत्कार

113

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दिल्ली येथील राजपथावर 26 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचालनासाठी महाराष्ट्र व गोवा राज्याच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे संघनायक म्हणून चामोर्शी येथील केवळरामजी हरडे महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा गोंडवाना विद्यापीठ रासेयो विभागाचे विभागीय समन्वयक डॉ. पवन नाईक यांची निवड झाल्याने यशोदीप शिक्षण संस्थेचे संंस्थापक अध्यक्ष अरुण हरडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या महाविद्यालयाला हा बहुमान मिळाल्याने महाविद्यालयाचे व डॉ. नाईक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ. नाईक यांनी आपल्या यशाचे श्रेय यशोदीप संस्था गडचिरोलीचे संस्थापक अध्यक्ष अरुण हरडे, सचिव डॉ. स्नेहा हरडे, प्राचार्य डॉ. एच. पी. बनपूरकर यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना दिले आहे.