Home गडचिरोली चक्क तलावात नवीन शाळा इमारतीचे बांधकाम

चक्क तलावात नवीन शाळा इमारतीचे बांधकाम

136

– गावकऱ्यांचा विरोध

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील येनापूर येथील तलावाच्या पोटात नवीन शाळा इमारतीचे सुरू केलेले बांधकाम रद्द करून सुरक्षित जागेवर बांधकाम करावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली, संवर्ग विकास अधिकारी पं. स. चामोर्शी, कार्यकारी अभियंता (सर्व शिक्षा अभियान) जिल्हा परिषद गडचिरोली यांना दिल्याची माहिती गावकऱ्यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

चामोर्शी तालुक्यातील गटग्रामपंचायत सोमनपल्ली अंतर्गत येनापुर जि. प. शाळेच्या नविन इमारतीचे बांधकाम मंजुर झाले असल्याने ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांनी पाच महिन्यापूर्वी सरपंच निलकंठ निखाडे यांनी वनविभागाच्या दुर्गापूर हद्दीमध्ये तलावाच्या पोटात खोदकाम करून शाळा बांधकामास सुरुवात केली. त्यावेळी सुध्दा गावकऱ्यांनी तलावाच्या पोटात शाळा इमारतीचे बांधकाम करण्यास विरोध करून बांधकाम थांबविले होते. परंतु परत त्याच ठिकाणी तलावाच्या पोटात मागील बांधकाम केलेल्या जागेच्या बाजुला परत ले ऑऊट टाकून बांधकामाकरिता सुरुवात केलेली आहे.

सदर नवीन शाळा इमारतीचे तलावाच्या पोटात बांधकाम केल्यास तलावात पाणी राहत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होऊन तलावात पाणी राहत असल्यान मुलांच्या जिवास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर जागा दलदलीची असल्याने इमारतीचे बांधकाम सुध्दा कोसळण्याची शक्यता आहे. तसेच तलावाखाली शेतकऱ्यांची शेती असून शेतीतील धान पिकाचे उत्पन्न घेवुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करित आहेत. सदर इमारतीमुळे तलावाची पार फोडण्याची पाळी आल्यास शेतकऱ्यांची उपासमारीची पाळी येऊ शकते. तरी वरील बाबीचा विचार करून दुसन्या सुरक्षीत ठिकाणी शाळच्या इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, अशीही मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

यापूर्वी सुध्दा सरपंच व सचिव संगणमत करून ग्रामपंचायतमध्ये गैरव्यवहार केल्याचे अनेक तक्रारी सुध्दा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये करण्यात आलेल्या आहेत. मात्र आतापर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही, असा आरोपही गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या पत्रकार परिषदमध्ये पालक आणि गावकऱ्यांनी केला आहे.

सदर ठिकाणी बळजबरीने बांधकाम केल्यास शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवास धोका असून काही अपरिहार्य घटना झाल्यास याला ग्रामपंचायतचे सरपंच आणि सचिव तसेच तलावाच्या पोटात बांधकाम करण्यास मंजुरी देणारे प्रशासकिय अधिकारी हे जबाबदार राहतील. तलावाच्या पोटात होणारे नव्या शाळा इमारतीचे बांधकाम तत्काळ यांबविण्यात यावे व दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित जागेवर शाळा इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, अशी सर्व गावकरी, विद्यार्थी व पालकांची मागणी आहे.

पत्रकार परिषदेला सुरेश विठोबा गुंतीवार, राजू येगोलपवार, राहुल येगोलपवार, गमतीदास राऊत, आदित्य जाधव, हनुजी कन्नाके, शांताराम कुमरे, किशोर गोपवार, मोहन बंडावार तथा पालक व  गावकरी मंडळी उपस्थित होते.

error: Content is protected !!