– गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांचा मोर्चा
– जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : NDTV व बस्तर जॅक्शनचे पत्रकार मुकेश चंद्रकार छत्तीसगड यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, गडचिरोली जिल्हयात रेती, मुरूम माफीया, दारू विक्रेते यांचे अवैध धंदे बंद करावे, जिल्ह्यातील पत्रकार हे वृतांकन करण्यासाठी नक्षलग्रस्त भागात जात असतात यात मुकेश चंद्राकार यांची पुर्नरावृत्ती गडचिरोली जिल्हयात होवू नये, महाराष्ट्र शासन अधिनियम सन २०१९ क्र. १९ दिनांक ८ / १० / २०१९ राजपत्रानुसार जिल्ह्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे आदी मागण्याकरिता गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून जिल्ह्याधिकारी अविशांत पडां व जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांच्या मार्फतीने देशाचे महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री छत्तीसगड, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस आदींना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सदर मोर्चात पत्रकार प्रा. मुनिश्वर बोरकर, व्येंकटेश दुडमवार, लोकमत पत्रकार संजय टिपाले, सुरेश पद्मशाली, मुकूंद जोशी, उदय धक्काते, हेमंत डोर्लीकर, प्रल्हाद म्हशाखेत्री, प्रकाश ताकसांडे, प्रकाश दुबे, जगदिश कन्नाके, मारोती भैसारे, विलास ढोरे, सुरज हजारे, राजरतन मेश्राम, प्रा. दिलीप कवरके, नाशिर जुम्मन शेख, हेमंत हुनेदार, महेश सचदेव, दिनेश बनकर, कृष्णा वाघाडे, हस्ते भगत, नाझिर शेख, भाविकदास कळमकर, मुकेश हजारे, संदिप कांबळे, विनोद कुळवे, किशोर खेवले, सोमनाथ उईके, निलेश सातपुते, संतोष सुरपाम, शंकर ढोलगे, जयंत निमगडे, हर्ष साखरे, कबिर निकुरे, प्रमोद राऊत, विजय शेडमाके, टावर मडावी, उमेश गझपल्लीवार, पुंडलिक भांडेकर, अनुप मेश्राम, श्रावण वाकोडे, कालिदास बुरांडे, धनराज वासेकर, विलास वाळके, गोर्वधन गोटाफोटे, रवि मंडावार, राजेश खोब्रागडे, चोखोबा ढवळे, सतिस टेंभुर्णे, गेडाम, धम्मपाल दुधे, नाजुक भैसारे, रेखाताई वंजारी, विजयाताई इंगळे, तिलोतमा हाजरा यांच्यासह जिल्हयातील शेकडो पत्रकार उपस्थित होते.







