Home गडचिरोली आदिवासी भागातील लोकांच्या जीवाची किंमत शुन्य ; धोकादायक स्थितीत पुलावर वाहन उभे

आदिवासी भागातील लोकांच्या जीवाची किंमत शुन्य ; धोकादायक स्थितीत पुलावर वाहन उभे

89

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नक्षलग्रस्त, दुर्गम, आदिवासी भाग म्हणून ओळख असलेल्या दक्षिण गडचिरोली अहेरी तालुक्यातील आलापल्ली – भामरागड मार्गावर पेरमिली गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. सदर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे. पुलाच्या अगदी वरच्या भागात बंद स्थितीतील एक वाहन धोकादायक स्थितीत उभे करण्यात आले आहे. सदर वाहनामुळे अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या परिसरातील लोकांच्या जीवाची किंमत शुन्य झाली आहे का ? असे यावरून दिसून येत आहे.

या मार्गावरून अनेकजण दिवस-रात्र ये – जा करतात. उपमुख्यालय व जिल्हा मुख्यालय जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने या मार्गावरून अवागमन करण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. असे असतानाही पुलावर अशाप्रकारे हे वाहन उभे करण्यात आले आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसात या परिसरातील लोकांचे असे तरी जीव जाईल, याची शक्यता निर्माण झाली आहे.

रस्ता वाहतुकीचे नियम बघता रस्त्याच्या कडेवर अथवा रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहन उभे करणे रस्ता परिवहन कायद्याने गुन्हा आहे. सदर प्रकरणात रस्ता परिवहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्या जाईल का ? अशी चर्चा स्थानिक परिसरात आहे. ती पुन्हा एकदा लोकांच्या जीवाची किंमत शुन्य की काय म्हणून या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

पुलावर बंद स्थितीत धोकादायक वाहन उभे करणे वाहतूक परिवहन कायदा अंतर्गत गुन्हा असल्याने या कायद्याअंतर्गत वाहन मालकावर व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यावर गुन्हे दाखल करून आदिवासी समाजातील लोकांच्या जीवाला न्याय द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

error: Content is protected !!