Home गडचिरोली मंगेर येथे अंगणवाडी कर्मचारी युनियनची (सिटु) बैठक संपन्न

मंगेर येथे अंगणवाडी कर्मचारी युनियनची (सिटु) बैठक संपन्न

103

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एटापल्ली व भामरागड तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी संघटनेची (सिटु) बैठक एटापल्ली तालुक्यातील मंगेर येथे 7 जानेवारीला युनियनचे जिल्हा संघटक अमोल मारकवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावे, पेन्शन व ग्राज्युटी देण्यात यावी, अंगणवाडी केंद्रात विद्युत मिंटर देण्यात यावे, अमृत आहार योजनेचा लाभ देण्यात यावे, गडचिरोली जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नक्षलग्रस्त भत्ता देण्यात यावे या विषयावर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत अमोल मारकवार, छाया कागदेलवार, राजेश्री लेखामी, सुनंदा बावणे, मनिषा पडालवार, शोभा बत्तुलवार, करुणा दुर्वे, वैशाली दुर्गे, भारती सिडाम, अर्चना अमोल मारकवार, जयश्री वाळके, लिलिगेश केरकेटा, मोनी विश्वास, बबिता मडावी, नसुरा होयामी, सुपरना सरकार, बिनापाणी मंडल, मनिषा येनगंटीवार, प्रेमिला झाडे सेविका व मदतनीस उपस्थित होते.

error: Content is protected !!