– ब्रम्हपुरी, सिंदेवाही येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने नागरी सत्कार व विविध कार्यक्रमांचे आयोजन
विदर्भ क्रांती न्यूज
ब्रम्हपुरी : राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते, तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक साधली. आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व विजयानंतर प्रथम आगमनाप्रीत्यर्थ ब्रम्हपुरी, सिंदेवाही तालुका तथा शहर तसेच काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या वतीने भव्य नागरी सत्कार व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ब्रह्मपुरी येथे आज काँग्रेसने नेते आ. विजय वडेट्टीवार यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तर कमलाई निवासस्थान येथे वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्या दरम्यान केक कापून तसेच मिठाईचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाभरातून आलेले काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यानंतर सिंदेवाही शहरात तालुका तथा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य नागरी सत्कार, रक्तदान शिबिर ,ग्रंथतुला मोतीबिंदू तपासणी तथा शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान शेकडो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तके तसेच ग्रंथालयांना ग्रंथांची भेट देण्यात आली. तर पार पडलेल्या मोतीबिंदू शिबिरादरम्यान ६५१ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून यातून १८७ रुग्णांना करिता शस्त्रक्रियेकरिता पाठविण्यात येणार आहे. तसेच पार पडलेल्या रक्तदान शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. तर काँग्रेस कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांच्या वतीने आयोजित वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी केक कापून तसेच शाल व श्रीफळ देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी सिंदेवाही तालुका तसेच जिल्हा भरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचा सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला. आयोजित कार्यक्रमास ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी तथा सिंधेवाही तालुका काँग्रेस कमिटी तसेच काँग्रेस कमिटीचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, नगरपंचायत पदाधिकारी, नगरसेवक, व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी कार्यक्रमास हजेरी लावली.
पदाधिकारी, कार्यकर्ता व जनसामान्यांचा मी सदैव ऋणी : आ. विजय वडेट्टीवार
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रामध्ये मागील तीन वर्षापासून मला जनतेने आशीर्वाद रुपी प्रेम देऊन लोकप्रतिनिधित्वाची संधी दिली. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास व अतूट प्रेम याच्या बळावर मी क्षेत्राच्या विकासाकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले. तसेच आगामी काळातही करीत राहील. माझ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक कार्य हिरीरीने सहभाग घेऊन मला साथ दिली. तसेच येथील जनतेने मला मतदानरुपी प्रेम देऊन माझे हात बळकट केले. जनतेने दिलेले हे बळ आणि लढण्यासाठी माझ्यात निर्माण केलेले सामर्थ्य या अमूल्य प्रेमाचा मी सदैव ऋणी राहील, असे प्रतिपादन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले.