जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रतिभाताई चौधरी यांचा आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळातर्फे सत्कार

90

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जागतिक महिला दिनानिमित्य आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळातर्फे जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रतिभाताई चौधरी यांचा आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळाचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. सीमाताई गेडाम, माजी जि. प. अध्यक्षा योगीताताई भांडेकर, किरणताई रघुवंशी, नेहाताई समर्थ प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांनी केले. सूत्रसंचालन रश्मीताई बाणमारे तर आभार वैष्णवीताई नैताम यांनी मानले. सदर कार्यक्रमाला माजी नगरसेविका लताताई लाटकर,अल्काताई पोहनकर, कविताताई उरकुडे, वर्षाताई शेडमाके, ज्योतीताई बागडे, पुनम हेमके, कोमल बारसागडे, शैलाताई कुनघाडकर, मृणाली मेश्राम, अंजली कोडापे, देवाजी लाटकर, राजेंद्र सहारे तसेच आशा स्वयंंसेविका उपस्थित होते.