तेली समाज मेळाव्याला तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे

104

– श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त आरमोरी येथे तेली समाज वधू-वर परिचय मेळावा

– जेष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व रक्तदान शिबिराचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त तेली समाज मेळावा तसेच वधू-वर परिचय मेळावा, जेष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार व रक्तदान शिबिराचे आयोजन संताजी ग्राऊंड कोसा विकास केंद्राजवळ, वडसा रोड आरमोरी येथे ६ मार्च २०२२ ला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरी या तेली समाज मेळाव्याला तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे.
या मेळाव्याचे अध्यक्ष आरमोरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे राहतील. तर सत्कारमूर्ती म्हणून प्र-कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे डॉ. श्रीराम कावळे राहतील. उद्घाटक माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, माजी जि. प. अध्यक्ष योगीताताई भांडेकर यांच्या हस्ते पार पडणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष (दक्षिण) प्रभाकरजी वासेकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे, प्राचार्य पी. आर. आकरे, मुखरूजी खोब्रागडे, भाष्करराव बोडणे, प्रा. रवींद्र विखार, परसरामजी टिकले, डॉ. सुरेश रेवतकर, डॉ. संजय सुपारे, विनोद बावनकर, दामजी नैताम, डॉ. प्रदिप चापले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तेली समाज मेळाव्यात जिल्ह्यातील तसेच इतरही जिल्ह्यातील वधू-वर परिचयासाठी उपस्थित राहणार आहेत. वधू-वर नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन ॲप wadhuwar ची सुविधा उपलब्ध केली आहे. स्वतःचे मोबाईलवर ॲप डाउनलोड करून आपली नोंदणी करता येईल किंवा 8208274671, ९६५७८१६६७३, ९४२०१४५७८५ ला संपर्क करून घ्यावे, असे आवाहनही प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे.
मेळाव्याचे आयोजन श्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ आरमोरीचे अध्यक्ष बुद्धाजी किरमे, उपाध्यक्ष रामभाऊ कुर्झेकर, सचिव देविदास नैताम, सहसचिव तुळशीराम चिलबुले, कोषाध्यक्ष विवेक घाटूरकर, द्वारकाप्रसाद सातपुते व श्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळचे सदस्य यांनी केले आहे.