विरोधकांनी कितीही शिवरायांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा काम केले तरी महाराजांचे मावळे म्हणून आम्ही ते होऊ देणार नाही : महेंद्र ब्राम्हणवाडे

162

– येणापूर येथे मान्यवरांच्या हस्ते शिवस्मारकाच्या कामाचे भूमिपूजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शिवरायांमुळे प्रत्येक पिढीला शौर्य व जनकल्याणाची प्रेरणा मिळते. असे असताना देखील विरोधकांकडून नेहमी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण महाराजांचे मावळे म्हणून ते आम्ही कदापी सहन करणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. येणापूर येथील शिवस्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.
यावेळी उद्घाटक म्हणून प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ. नामदेवराव किरसान, सहउद्घाटक म्हणून शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार, जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, मुख्य अतिथी म्हणून प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. चंदाताई कोडवते, पोलीस निरीक्षक आष्टी कुंदन गावडे, सोमनपल्लीचे सरपंच नीलकंठ निखाडे, निकेश गद्देवार, मुकेश पत्तीवार, संदीप तिमाडे, ग्रा. पं. सदस्य वासुदेव देठेकर, येडलावार, मुख्य वक्ते म्हणून डॉ. हेमराज निखाडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक व जेष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते येणापूर येथे उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे चौकात भूमिपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सोबतच पोलीस विभागात कर्तव्यनिष्ठ पध्दतीने सेवा दिल्या बद्दल सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते दामोदर मंडलवार, सेवानिवृत्त अभियंता दिलीप गौरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच येणापूर च्या वतीने सत्कार करण्यात आला.