भाजपाच्या एटापल्ली महिला तालुका अध्यक्षा तथा माजी पाणीपुरवठा सभापती सुनीता चांदेकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

295

– जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून केले पक्षात स्वागत

विदर्भ क्रांती

गडचिरोली : सामान्य गोरगरीब जनतेला अच्छे दिनचे आश्वासन देत 2014 पासून केंद्रात भाजप सरकार अस्तिवात आली. पण सततच्या केंद्रातील अनियोजित नियोजनामुळे केंद्रातील सरकारने सामान्य जनतेचे जगने कठीण करून ठेवेल आहे. महागाई, बेरोजगारीनी वेग धरला असून ह्या अश्या जाचक व हुकूमशाही सरकार व पक्षाला सोडचिठ्ठी देत एटापल्ली नगरपंचायतच्या माजी नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती व विद्यमान एटापल्ली भाजप महिला तालुका अध्यक्षा सुनीता मोहन चांदेकर यांनी पदाचा व पक्षाचा राजीनामा देत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँगेस पक्षात प्रवेश केला. जिल्हा काँगेस कार्यालय गडचिरोली येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून सुनीता चांदेकर यांचा पक्षात स्वागत केले. यावेळी प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया महासचिव नंदूभाऊ वाईलकर, जिल्हा सचिव तथा निवडणूक सल्लागार सुनील चडगुलवार, काँग्रेस नेते जितेंद्र मुनघाटे, संजय चन्ने आदी माान्यवर व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.