संविधान दिनानिमित्त नमाद महाविद्यालयात उद्देशपत्रिकेचे वाचन वक्तृत्व व स्पर्धा

97

गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले व संविधानाचे महत्त्व या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शारदा महाजन यांनी उपस्थित प्राध्यापक व विध्यार्थ्यांकडून भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करवून घेतले. यावेळी डॉ. राकेश खंडेलवाल, डॉ. अर्चना जैन, डॉ. एच. पी. पारधी, डॉ. किशोर वासनिक, डॉ. भावेश जसानी, डॉ. बबन मेश्राम, डॉ. अश्विनी दलाल, डॉ. खुशबू होतचंदानी, डॉ. मस्तान शाह, प्रा. योगेश भोयर, डॉ. सुनील जाधव, डॉ. शशिकांत चौरे, डॉ. रवींद्र मोहतुरे, डॉ. संतोष होतचंदानी व प्रा. रितू तुरकर उपस्थित होते. संविधानाचे महत्त्व या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले. संविधानाची नीट अंमलबजावणी झाल्यास संविधानकर्त्यांंचे स्वप्न पूर्ण होऊन भारत विकसित आणि सुजलाम सुफलाम देश बनेल. प्रत्येक नागरिकाने संविधानातून आपल्याला मिळालेल्या मुलभूत अधिकाराचा वापर करून कर्त्यव्याप्रती सजग राहावे, असे आवाहन वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धकांनी केले.

प्रथम क्रमांक कोमल गजभिये, द्वितीय अमित गोपलानी तर तृतीय क्रमांक आकाश मेश्राम यांनी पटकाविला. स्पर्धेतील विजेत्यांना प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. योगेश भोयर व डॉ. मस्तान शाह यांनी केले. यावेळी डॉ. बबन मेश्राम व डॉ. उमेश उदापुरे यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून देणारे समयोचित भाषण केले. जगात प्रदीर्घ आणि सर्वसमावेशक असे संविधान आपले भारतीय संविधान आहे. या संविधानाच्या यशस्वी अंंमलबजावणीत सर्व नागरिकांचे हीत सामावलेले आहे. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं मी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय हा मंत्र अंमलात आणावे, असे आवाहन प्रमुख वक्त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. किशोर वासनिक व रविना माणुसमारे यांनी केले तर आभार डॉ. एच. पी. पारधी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांंनी सहकार्य केले.