चामोर्शी बसस्थानकाकरिता 3 कोटी व मार्कंडा बसस्थानकाकरिता 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर

62

– वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व खासदार अशोक भाऊ नेते यांचे चामोर्शी तालुका वासिय जनतेच्या वतीने जाहीर आभार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्य सरकारच्या सर्वसाधारण योजने अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या बसस्थानकाच्या आधुनिकरण व पुनर्बांधणी कार्यक्रम सन २०२१-२२ लेखाशिर्ष ६ फ अंतर्गत चामोर्शी व मार्कंडा बसस्थानकाला नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व खासदार अशोकभाऊ नेते यांच्या विशेष प्रयत्नांमुळे भाजप सरकारच्या कार्यकाळात मंजुरी मिळालेली होती. मात्र या बस स्थानकाचे बांधकाम सत्तेवरून भाजप सरकार गेल्याने व महाविकास आघाडी सरकारचे गलथान कारभारामुळे होऊ शकले नव्हते. आता पुन्हा भाजपा सरकार आल्याने सर्व अडचणी दूर झाल्या व चामोर्शी बसस्थानकासाठी ३ कोटी रुपये व मार्कंडा बसस्थानकासाठी २ कोटी रुपये बांधकामाची मान्यता मिळालेली असून चामोर्शी तालुक्यात एकूण ५ कोटी रुपये दोन बसस्थानकाकरिता मंजुर करण्यात प्राधान्याने मंजुर करण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच या चामोर्शी व मार्कंडा बसस्थानकाचे पुढील आठवड्यापर्यंत निविदा प्रक्रिया सुरू होत असल्याची माहिती नगरसेवक आशीष यांनी दिली आहे.
मात्र काही लोकांना यातील काहीही माहीत नसताना केवळ फोटो काढून घेत तीन कोटी रुपये मंजूर असताना चार कोटी आम्हीच मंजुर करून आणल्याचे खोटी माहिती देऊन चुकीचे श्रेय घेण्याचे प्रकार सुरु आहेत हे अत्यंत दुर्देवी असल्याचं नगरसेवक आशीषभाऊ पिपरे म्हणाले.
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकभाऊ नेते यांनी पुढाकार घेऊन चामोर्शीच्या बसस्थानकाला मंजुरी मिळवून दिली होती. परंतु त्यानंतर जागेची उपलब्धता करिता प्रचंड प्रयत्न करावे लागले. त्यांनतर त्याला यश मिळाले. मध्यंतरीच्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने पुन्हा ३ वर्षे त्यात निघून गेले याबाबत खासदार अशोक भाऊ नेते यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
याकरिता त्यांनी नुकतीच मुंबई येथे राज्य परिवहन महामंडळाचे , उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर चन्ने, उपमहाव्यवस्थापक कार्यकारी अभियंता, यांच्या सोबत नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांची बैठक लावून दिले व स्वतः मुंबई येथे शेखर चन्ने यांच्यासोबत पुढील कार्यवाही बद्दल भ्रमणध्वनीवर बोलले व रा. प. नागपूर येथील विभागीय अभियंता श्री. खांडेकर यांच्याकडून माहिती घेऊन चर्चा केली. सदर चामोर्शी मार्कंडा बसस्थानकाच्या कामाला बांधकामाला मंजुरी मिळालेली आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत बांधकामाच्या दोन्ही निविदा निघणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे आता लवकरच या ठिकाणी बस स्थानकाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांनी दिली आहे.
परंतु चामोर्शी बसस्थानकाच्या बांधकामाकरिता ३ कोटी रुपये मंजूर असताना कोणतेही प्रयत्न न करता ४ कोटी रुपये मंजूर झाले आहे अशी चुकीची माहिती जनतेत प्रचार करणे व प्रसिद्धीस देणे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी भावना नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांनी व्यक्त केली.