विदर्भ क्रांती न्यूज
सावली : सावली तालुक्यातील खेडी येथील रहिवासी स्व. दिपक बाळु पेंदाम हे पोंभुर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी येथे महावितरण कंपनीमध्ये लाईनमॅन या पदावर कार्यरत होते. दीपक बाळु पेंदाम वय ३२ वर्ष हे ,दिवाळीच्या दिवशी दिं.२२ऑक्टोंबर २०२२ ला विद्युत दुरूस्तीचे काम करीत असतांना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्यामुळे विजेच्या धक्क्याने त्यांचा आकस्मिक मृत्यु झाला.त्यांच्या मागे त्यांची आई, पत्नी व दोन छोट्या मुली आहेत. पेंदाम परिवारावर आलेल्या दुःखाची माहिती या क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांना दिली असता या संबंधित दखल घेत खेडी येथे त्यांच्या स्वघरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांच सांत्वन करून पेंदाम यांच्या कुटुंबास खासदार अशोकजी नेते यांच्याकडून आर्थिक मदत सुद्धा याप्रसंगी देण्यात आली.
तसेच चांदली बुज. येथील स्व. राकेश तुकाराम कंकडलवार वय २६ वर्ष हे दिं.२३/०८/२०२२ रोजी विटाभट्टीचे काम करीत असतांना अचानक त्यांच्या पायाला सापाने सर्पदंश केल्याने त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. चांदली बुज. येथील बंडू धोंडू बद्रीवार हे दि. २८/०९/२०२२ ला मेंढ्या चराई करीत असताना किसाननगर जवळ अचानकच पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले.
चांदली बुज. येथील या दोन्ही घडलेल्या घटने संबंधीची माहिती सरपंच विठ्ठल येगावार यांनी या क्षेत्राचे खासदार श्री. अशोकजी नेते यांना माहिती दिली असता या संबंधित दाखल घेत त्यांच्या स्वघरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केेले व याप्रसंगी आर्थिक मदत सुद्धा देण्यात आली.
यावेळी खासदार अशोकजी नेते, गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा, जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, ता. महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोमावार, भाजपाचे जेष्ठ नेते प्रकाश पा.गड़्ड़्मवार, सरपंच चांदली बुज.चे विठ्ठल येगावार, सरपंच खेडी सचिन काटपल्लीवार, युवा नेते गौरव संतोषवार, अनिल येंनगटिवार शाखा-भाजपा अध्यक्ष चांदली बुज. तुकाराम कंकडलवार, अनिल अमृतवार, शालीक कंकडलवार, बुधाजी सानेवार, अनिल माचेवार, पुरुषोत्तम मर्लावार ग्रा.पं.सदस्य, पुरुषोत्तम नाड़्मवार, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.