सुरजागड प्रकल्पाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्या करणार चक्काजाम आंदोलन

113

– सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या विरोधात व जिल्ह्यातील इतर विविध मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्या, 25 ऑगस्टला आष्टी येथे चक्काजाम आंदोलन करणार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या विरोधात व जिल्ह्यातील इतर विविध प्रश्नांच्या मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील मुख्य चौकात उद्या, 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

चक्काजाम आंदोलनातील प्रमुख मागण्या :- 
ओला दुष्काळ जाहीर करा, आष्टी – आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर सुरजागड लोहखनीज प्रकल्पातील जळवाहतूक ओव्हरलोडेड ट्रक बंद करण्यात यावे,
आष्टी- आलापल्ली रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, सुरजागड लोहखनीज प्रकल्पातून कच्चा माल घेऊन जाणारे ट्रक पर्यावरण नीयमांचे उल्लघंन करत आहेत तरी, तत्काळ त्या ट्रकवर ताडपत्री बांधून जळणवळण करावे, कोनसरी घाटकुर रस्त्याचे तत्काळ सुधारणा करावी व जडवाहतूक बंद करावे, आष्टी येथील वैनगंगा नदीवरील पुलाचे काम तात्काळ पुर्ण करावे, कोनसरी लोहप्रकल्पामध्ये स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य द्यावे, आलापल्ली सिरोचा राष्ट्रीय महामार्गाचे तत्काळ काम सुरू करावे, मेडीगट्टा धरणामुळे आपल्या शेतकऱ्याचा कोणताही फायदा नसताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे धरणातून येणाऱ्या बँँक पाण्यामुळे सिरोचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरपरस्थितीमुळे शेती, घरे, जनावरे याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी सदर कराराबाबत पुनर्निरिक्षण करावे आदी मागण्यांंचा समावेश आहेे.

या आंदोलनात सर्व शेतकरी बांंधव, नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करण्यात आले आहे.