धोडराजच्या जंगलात पोलीस – नक्षल चकमक ; एक पोलीस जवान जखमी

206

– जखमी जवानाला उपचारासाठी हेलिकॉप्टरने हलविले नागपूरला

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रा अंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात पोलीस व  नक्षलवाद्यांंमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एक पोलीस जवान जखमी झाला. सदर घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, धोडराज जंगल परिसरात सी-६० पोलिस जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस जवानांंवर अचानक अंधाधुंद गोळीबार केला. पोलिसांनीही नक्षल्यांंना प्रत्युत्तर देत गोळीबार केला. यात एक पोलीस जवान जखमी झाला असून त्या जवानाला तातडीने हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. घटनास्थळावरून नक्षल्यांचे मोठ्या प्रमाणात साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांंना यश आले आहे. घटनास्थळी काही नक्षल्यांंचा खात्मा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सदर चकमकीनंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलिस कुमक वाढविण्यात आली असून नक्षल शोध मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे.