आशीर्वाद सभागृह गोकुळनगर येथे राकाँपातर्फे संत गाडगेबाबा जयंती साजरी

81

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 23/02/2022 ला आशीर्वाद सभागृह गोकुळनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली यांच्या वतीने संत गाडगे बाबा जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली शहर अध्यक्ष विजयभाऊ गोरडवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व माल्यार्पन करून संत गाडगे बाबा प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गडचिरोली शहर अध्यक्षा तथा माजी नगरसेविका मिनलताई चिमुरकर, माजी नगरसेविका तथा जिल्हा संघटन सचिव महिला गडचिरोली संध्याताई ऊईके, जेष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते नईमभाई शेख, भास्करभाऊ निमजे, अमोल कुळमेथे, प्रसाद पवार, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गडचिरोली तालुका अध्यक्षा श्रीमती निताताई बोबाटे, अमरभाऊ खंडारे, अजय कुकडकर, भास्करभाऊ इंगोले, राष्ट्रवादीचे तालुका चामोर्शी निरीक्षक आरतीताई कोल्हे, सपना मरस्कोल्हे, मिना डहाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.