देसाईगंज येथे भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

98

– भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देसाईगंज येथे भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी- शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- आरपीआय- पीरीपा महायुतीचे गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अशोक महादेवराव नेते यांच्या प्रचारार्थ देसाईगंज येथील आमदार कृष्णा गजबे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या खाली प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सहकारमहर्षी प्रकाशजी सावकार पोरेड्डिवार यांच्या हस्ते तथा आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी स्थापनादिनानिमीत्त प्रचार कार्यालयामध्ये आमदार कृष्णा गजबे आणि अन्य मान्यवर मंडळींनी पंडीत दिनदयाल उपाध्यायजी, भारत माता आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन स्थापनादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सहकारमहर्षी तथा विधानसभा निवडणूक प्रमुख प्रकाश सावकार पोरेड्डीवार, लोकसभा निवडणुक प्रमुख किसनजी नागदेवे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष बबलूभाई हुसैनी, डॉ. संगीताताई रेवतकर, जिल्हा उपाध्यक्ष शालूताई दंडवते, ग्रामीण तालुका अध्यक्ष सुनील पारधी, शहर तालुका अध्यक्ष सचिन खरकाटे, तालुका महामंत्री योगेशजी नाकतोडे, संतूभाऊ श्यामदासानी, तालुका महामंत्री वसंतभाऊ दोनाडकर, रेवताताई अलोणे, शेवंताताई अवसरे, बेबीनंदा पाटील, श्रीमती कावळे, भाष्कर पाटील नाकाडे, जोतू तेलतुमडे, हिरालाल शेंडे, प्रमोद झिलपे, कपिल बोरकर, पवन क्षीरसागर, श्यामा अलोने, दीपक झरकर, श्रीकांत नागीलवार, नितीन लाडे, राजेश कनोजे, रवी प्रधान, सागर नाकाडे, कुलदीप आमले, सोनू गोस्वामी, अमोल पत्रे, पितांबर मेश्राम, तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.