उर्समध्ये काँग्रेसचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांची उपस्थिती

149

– उर्स समितीतर्फे डॉ. उसेंडी यांच्यासह मान्यवरांचे स्वागत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा येथे हजरत वली हैदर शाह रहेमातुल्ला अलैह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या उर्सला ३५१ वर्षाची परंपरा आहे. या उर्समध्ये महाराष्ट्र राज्यसह सीमेलगत असलेल्या राज्यातील सर्वच जाती- धर्माचे लोकं या उत्सवात सहभागी होतात. या उर्समध्ये महाराष्ट्र राज्य आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांना संबोधित केले. त्याचप्रमाणे डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी म्हणाले, उर्स या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोकं खुप मोठ्या संख्येने येत असतात. अश्यातच आपलं सर्व धर्म समभाव व प्रेम, बंधूत्व अशा एकात्मतेचे प्रतीक दिसून येते. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये देशात हिंसाचार व द्वेष पसरवत आहेत. लोकांना धर्म, जात व भाषेच्या नावावर समाजासमाजात भांडण लावून द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे. संस्थांमधील इतर मागासवर्गीयांचे आरक्षण संपविण्याचे कारस्थान सुरू आहे. यासाठी आपण सर्वांनी देशात द्वेषाचे वातावरण पसरवण्याकडे लक्ष न देता सर्व जाती धर्माचे लोकं आपण एक आहोत असा एकतेचे संदेश दिला पाहिजे, असे प्रतिपादन केले.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष हसनअली गिलानी, सिरोंचा नगर पंचायतचे उपाध्यक्ष बबलू, सिरोंचा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सतिश जिवाजी, सिरोंचा आदिवासीं काँग्रेसचे अध्यक्ष कारे मडावी, ऊर्स समितीचे अध्यक्ष रमजान खान, नगरसेवक इम्तियाज खान, काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद अली, सराय्या सोनारी, अजीज शेख, मदन मोडम आदी उपस्थित होते.