– गोंदिया जिल्हा भाजपा कामगार मोर्चा प्रभारी गोवर्धन चव्हाण यांची उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
गोंदिया : कामगार मोर्चा भाजपातर्फे गोंदिया जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम आणि आगामी कार्यक्रमाबद्दल चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन जिल्हा कार्यालय भाजपा गुरुनानक वार्ड गोंदिया येथे रविवार, २४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजता करण्यात आले आहे.
या बैठकीला गोंदिया जिल्हा भाजपा अध्यक्ष एड. येशुलाल उपराडे, पुर्व विदर्भ कामगार मोर्चा भाजपा अध्यक्ष तथा गोंदिया जिल्हा कामगार मोर्चा अध्यक्ष धनंजय वैद्य, गोंदिया जिल्हा भाजपा कामगार मोर्चा प्रभारी तथा कामगार मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोवर्धन चव्हाण, कामगार मोर्चा भंडारा- गोंदिया लोकसभा संयोजक राजेश डोंगरे, कामगार मोर्चा गडचिरोली – चिमुर लोकसभा संयोजक संजय दरवडे, पुर्व विदर्भ विभाग कामगार मोर्चा उपाध्यक्ष वसंता चामट, पुर्व विदर्भ विभाग कामगार मोर्चा उपाध्यक्ष अशोक चन्ने, पुर्व विदर्भ विभाग कामगार मोर्चा उपाध्यक्ष तथा महिला संयोजक ज्ञानेश्वरी वासनिक, पुर्व विदर्भ विभाग कामगार मोर्चा कायदा सल्लागार एड. हेमलता फतेह यांची प्रमुख उपस्थिती राहणार नाही.
या बैठकीला भाजपा कामगार मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष खेमेंद्र (बबलु) वासनिक, जिल्हा महासचिव हिवराज मेश्राम, जिल्हा महासचिव विनोद ठाकुर, जिल्हा महासचिव सचिन शेंद्रे, जिल्हा महासचिव व्यंकट खोब्रागडे यांनी केले आहे.