लोहार, गाडीलोहार व तत्सम जातीचे नागपूर येथे ९ वे राज्यस्तरीय महाअधिवेशन

176

– महाअधिवेशनात समाज बांधवांनी सहभागी व्हावे : नंदूभाऊ कुमरे

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर व नागपूर जिल्हा लोहार समाज संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य लोहार, गाडीलोहार, खाती, खातवाढी व तत्सम जातीचे राज्यस्तरीय ९ वे महाअधिवेशन व उपवर वधू – वरांचा राज्यस्तरीय परिचय मेळावा २३ व २४ डिसेंबर रोजी चक्रधरनगर जुना सुभेदार क्रीडा मैदान नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या महाअधिवेशनाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना गडचिरोली विधानसभा संघटक नंदुभाऊ कुमरे यांनी केले आहे.

शनिवार, २३ डिसेंबर रोजी दुपारी 1 ते रात्री 10 वाजेपर्यंत पदाधिकाऱ्यांचा सत्कार, वधू – वरांचा राज्यस्तरीय परिचय मेळावा, सास्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, नकला गायन व मान्यवरांचे मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांला उद्धघाटक म्हणून दक्षिण नागपूरचे आमदार मोहनजी मत्ते, अध्यक्ष म्हणून वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूरचे माजी कार्याध्यक्ष लक्ष्मणजी मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून हिंगणा नागपूरचे आमदार समीरजी मेघे, राधिकाताई पांडव चारीटेबल ट्रस्ट नागपूरचे अध्यक्ष गिरीशभाऊ पांडव, नागपूरचे नगरसेवक अविनाश ठाकरे, नगरसेविका रुपाली परशू ठाकूर, नगरसेविका स्वाती चंद्रकांत आखतकर, संपादक हनुमंत चव्हाण, प्रभाकर लाड, माजी सरपंच सुनिताताई लोहार, नगरसेविका मिनल लोहार, दिलीप थोरात, संजय कोळंबेकर, दिलीप बसव, अस्मिता आढावे, सुनिताताई लोहार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रविवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत राज्यस्तरीय महाअधिवेशन, मान्यवरांचे मार्गदर्शन, स्मरणिका प्रकाशन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, अध्यक्ष म्हणून वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूरचे अध्यक्ष प्राचार्य चरणदास बावणे तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री सुधीरभाऊ मुंगगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, हिंदू लोहार समाज संघ मुंबईचे अध्यक्ष अण्णा जोशी, गोंड महासभा आसीफाबादचे (तेलंगाणा) राष्ट्रीय उपाध्यक्ष शिडाम अर्जु मारू, कम्मारा सेवा सघ आसीफाबादचे (तेलंगणा) जिल्हाध्यक्ष सिताराम सुर्तीकर, महाअधिवेशन आयोजन समिती नागपूरचे अध्यक्ष एल. डी. सतिकोसरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहनही शिवसेना गडचिरोली विधानसभा संघटक नंदुभाऊ कुमरे यांनी केले आहे.