राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गडचिरोली शहरात आज भव्य पथसंचलन

62

– २३ ते २५ डिसेंबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चंद्रपूर विभागाचे प्रवासी कार्यकर्ता शिबिर गडचिरोलीत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : २३ डिसेंबर ते २५ डिसेंबरला गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चंद्रपूर विभागाचे प्रवासी कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात शासकीय चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील संघाचे प्रवासी कार्यकर्ते ३ दिवस सहभागी होणार आहेत. यानिमित्त २३ डिसेंबर रोजी गडचिरोली शहरातील मुख्य रस्त्याने या स्वयंसेवकांचे पथसंंचलन निघणार आहे.

पथसंचलनाची सुरुवात शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड गडचिरोली येथून होणार असून संघ कार्यालयमार्गे रेड्डी गोडाऊन चौक -एस स्मार्ट- चामोर्शी रोड-इंदिरा गांधी चौक- धानोरा रोड- बस स्टँड समोरून रिलायन्स मार्ट येथून फिरून परत शिवाजी कॉलेज येथे सांगता होणार आहे. सकल समाजाने या पथसंचलनाचे स्वागत करावे, असे आवाहन नगर संघचालक निळकंठराव भांडेकर व जिल्हा संघचालक घिसुलालजी काबरा यांनी केले आहे.