गडचिरोली नगरपरिषदेच्या वतीने भव्य महिला शिबिर व संस्कृतिक कार्यक्रम

70

– मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत उपक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरात महिलांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत असल्या तरी त्यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी एकत्रितरित्या विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याने गडचिरोली शहरातील लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात येणार आहे. याकरिता स्थानिक आठवडी बाजार परिसर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत महिला लाभार्त्यांचे भव्य महिला शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे तर अध्यक्ष न. प. प्रशासक तथा मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर होते. मार्गदर्शक प्रा. डॉ. सविता सादमवार, प्रमुख अतिथी माजी न. प. सभापती मुक्तेश्वर काटवे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, माजी नगरसेविका लताताई लाटकर, माजी माजी नगरसेवक संजय मेश्राम, उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार, अभियंता भालेराव, पुष्पाताई करकाडे नप कर्मचारी तसेच लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते “सोन चिरैया शहर उपजीविका” केंद्राचे शुभारंभ करण्यात आले.