विदर्भ क्रांती न्यूज
ब्रह्मपुरी : चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील झिलबोडी येथे श्री हनुमान मंदिर देवस्थान मंडळ झिलबोडीच्या वतीने ‘अंधारलेल्या वाटा’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन 27 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात आले होते. या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी संवैधानिक तरतुदींचे शासनकर्त्यांतर्फे पालन झाले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी मंचावर जगदीशजी पिलारे, अमरभाऊ गाडगे, रवीजी शिंदे, कैलासजी खरकाटे, सरपंच नीताताई शेंडे, ग्रा. पं. सदस्या उर्मिलाताई धोटे, सुधीरजी पंदीलवार, उपसरपंच प्रवीण तलमले, गजाननजी शेंडे, मनोजजी शेंडे, विलासजी कुथे, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.