गोंदिया जिल्हा संघ कार्यालयास आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिली सदिच्छा भेट

108

– संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत आदिवासी समाजाच्या डिलिस्टिंग संदर्भात केली चर्चा

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया, ३० ऑक्टोबर : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी गोंदिया जिल्ह्यात प्रवासात असताना गोंदिया येथील संघ कार्यालयामध्ये संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आदिवासी समाजाच्या डिलिस्टिंग संदर्भात नागपूर येथे २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आदिवासी समाज बांधवाच्या महामोर्चा संदर्भात चर्चा केली.

याप्रसंगी भंडारा – गोंदिया विभाग सहसंघचालक दलजीत सिहंजी खालसा, गोंदिया जिल्हा संघचालक लिलारामजी बोपचे, नगर सहसंघचालक डॉ. मुकेशजी येरपुडे, जिल्हा प्रचारक रवींद्रजी ताजने, जिल्हा कार्यवाह संजयजी भावे, जिल्हा सहकार्यवाह बाळकृष्णजी बिसेन, गोंदिया नगर कार्यवाह शरदजी काथराणी, जिल्हा सेवा प्रमुख जितेंद्रजी बिसेन, जिल्हा शारीरिक प्रमुख प्रवीणजी पटले, मयंक व्यास, कुणाल व्यास उपस्थित होते.