विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ११ ऑक्टोबर : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील स्थानिक रहिवासी प्रकाश नल्ला हे अपंग व्यक्ती असून ते रोजंदारी करून कसंबसं आपल्या परिवाराला आधार देत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. पण काही दिवसापासून ते आजारी होते आणि त्या अल्पशा आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रकाश नल्ला यांच्या कुटूंबावर खूप मोठ संकट आलं. कुटुंबात आई, पत्नी आणि दोन मुले आहेत. अत्यंविधी करण्यासाठी आर्थिक समस्या, परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत होते. याबाबत कार्यकर्ते श्रीनाथ राऊत यांनी अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या लक्षात आणून दिली. राजे साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या कार्यकर्ते यांच्या माध्यमातून प्रकाश नल्ला यांच्या कुटूंबाला मदतीचा हात देत 10000-/(दहा हजार) रुपये आर्थिक मदत केली.
तसेच शासनाच्या कल्याणकारी योजना प्रकाश नल्ला यांच्या कुटूंबाला मिळण्यासाठी मदत करणार आणि आपण सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करण्याचे आश्वासन सुध्दा यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिले. त्यावेळी संपूर्ण नल्ला कुटुंबाने राजे साहेबांचे आभार मानले. विशेष बाब म्हणजे अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे नेहमीच आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील गरजूंना आर्थिक मदत करीत असतात. सर्वतोपरी त्यांना सहकार्य करत असतात. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते श्यामसुंदरराव मेचिनेनी, तालुका महामंत्री श्रीनाथ राऊत, तालुका सचिव देवेंद्र रंगु, कार्यकर्ते, अंकिसा येथील गावकरी व संपूर्ण नल्ला कुटुंब उपस्थित होते.