ज्ञानदिप अभ्यासिकेला वातानुकूलिन संच भेट

298

– प्रशांत गुंडावार दाम्पत्याचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

चामोर्शी, ७ ऑक्टोबर : येथील आष्टी कार्नर हनुमान मंदिराचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर गुंडावार यांचे अमेरिकेत स्थायिक असलेले चिरंजीव प्रशांत प्रभाकर गुंडावार व अंशुजा प्रशांत गुंडावार दाम्पत्याच्या पुढाकारातून ज्ञानदिप अभ्यासिकेला वातानुकूलिन (AC) संच भेट दिल्याने तेथील सोयी सुविधेत भर पडली आहे.

जिल्हा विकास संशोधन व कार्यान्वय संस्था तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या ज्ञानदिप अभासिकेस वातानुकूलिन (AC) संच भेट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पी. जी. सातार तर उद्घाटक प्रशांत गुंडावार होते. याप्रसंगी मंदिराचे अध्यक्ष काशिनाथ पिपरे, ज्ञानदिपचे सचिव डी. बी. चितारकर, जे. जी. म्हरस्कोले, मंदिराचे सचिव महेश आंबटवार, मोरेश्वर चलकलवार, परचाके, बबनराव वडेट्टीवार, अभ्यासिकेची अध्यक्ष जगदीश समर्थ, सचिव जगदीश दुधबळे, मंगेश साखरे, रंजीत उंदीरवाडे, किशोर लटारे, श्रीकांत कुंघाडकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी चामोर्शी येथील प्रभाकर गुंडावार यांचे चिरंजीव अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या प्रशांत गुंडावार व अंशुजा प्रशांत गुंडावार हे दाम्पत्य चामोर्शी आले असता त्यांनी ज्ञानदिप अभ्यासिकेला वातानुकूलित संच भेट देऊन तेथील सोयी सुविधेत भर टाकली. ते कौतुकास पात्र ठरले असून त्यानिमित्त प्रशांत गुंडावार यांचा संस्थेच्या वतीने प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना प्रशांत गुंडावार म्हणाले, मी या गावात जन्मलो असल्याने मी नाते जपण्याचा व सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. ज्ञानदीप अभ्यासिकेत अभ्यास करीत असलेल्या विद्यार्थ्यांना सोय उपलब्ध व्हावी म्हणून एसी संच भेट ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. या अभ्यासिकेच्या सोयी सुविधेत भर टाकली त्याचा निश्चितच लाभ होईल त्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन करत ध्येय गाठावे, असे भावनिक आवाहन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी. जी. सातार यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक म्हरस्कोले यांनी केले. या कार्यक्रमाला अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.