कारवाफा आश्रमशाळेत महात्मा गांधी जयंती साजरी

61

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २ ऑक्टोबर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देऊन वसतीगृह व शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय देवतळे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उच्च माध्यमिक शिक्षक टी. ए. आस्कर, माध्यमिक शिक्षक व्ही. व्ही. चव्हाण, वर्षा मस्के, प्राथमिक शिक्षक रविकांत पिपरे, व्ही. एम. बनगिनवार, झेड. एच. फाये, आय. एम. कुमरे, अधीक्षक जी. एस. सानप, अधीक्षिका पुष्पा चव्हाण उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांसह राणी मडावी, महिमा पोटावी, रोहित चाकटवार या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे औचित्य साधून रोजंदारी सफाईगार राधाबाई नरोटे व शिपाई संगीता करंगामी यांचा स्वच्छता योगदानासाठी मुख्याध्यापक विजय देवतळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. उच्च माध्यमिक शिक्षिका पद्मावती महेशगौरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.