– 15 दिवसातून गाव स्वच्छ करण्याची घेतली शपथ
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, १ ऑक्टोबर : ग्रामपंचायत नवरगाव अंतर्गत आज, 1 ऑक्टोबर रोजी 1 तारीख 1 तास महाश्रमदान निमित्त चारही गावात नवरगाव, राजोली, येरंडी, भुरनटोला या गावातील रस्ते, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, अंगणवाडी परिसरात श्रमदान करून स्वच्छता करण्यात आली.
यात ग्रामपंचायत नवरगावचे सरपंच रंजनाताई सिडाम, उपसरपंच लक्ष्मी झित्रु कोवा, सचिव खुशाल नेवारे, ग्रामपंचायत सदस्य कपील कोवा, मुन्ना गेडाम, बिसन हालामी, रोशनी कोकोडे, रेशमीला मडावी, रूपाली कोरचा, सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, महिला बचतगट महिला, पुरुष, महिला, युवक, युवती, शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित राहून 1 तास श्रमदान करून गाव सर्व स्वच्छ केले आहे. नियमित 15 दिवसातून गाव स्वच्छ करण्याचे ठरविले असून तशी शपथ घेतली आहे.