नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा : महेंद्र ब्राह्मणवाडे

62

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २२ जुलै : ततकालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपादृष्ठीने भाजप सरकारच्या काळात मेडिगट्टा  धरणाच्या नावाने सुलतानी संकट गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांवर आणि शेतकऱ्यांवर लादण्यात आले. त्यामुळेच जिल्ह्यात आणि पूर्व विदर्भातील शेतकरी आणि नागरिकांना वारंवार पूरपरिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
मेडिगट्टा धरणाच्या बॅक वॉटरमुळे तसेच वैनगंगा, प्राणीहीता, वर्धा, पर्लकोटा आणि जिल्ह्यातील इतर लहान – मोठ्या नंद्याना आजपर्यंत कधीही न आलेल्या महाभयंकर पुराचा सामना मागील 1 वर्षांपासून करावा लागत आहे. त्यामुळे आणि सतत सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकरी या संकटामुळे हवालदिल झाला आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात अद्याप फिरूकून सुद्धा पाहले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना पोरका सोडणाऱ्या निष्क्रिय पालकमंत्र्याकडून जिल्ह्याचे पालकमंत्री पद काडून घ्यावे व शासनाने नुकसानग्रस्तांना तातडीनी मदत जाहीर करावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.