‘त्या’ नराधमांना कठोर शिक्षा द्या व पीडित मुलीला न्याय मिळवून द्या

40

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महिला आघाडीच्या वतीने अहेरी पोलीस ठाण्यात पोलीस निरक्षक किशोर मानभाव यांना पीडित मुलीला योग्य न्याय मिळावा व अशा बलात्कारी हरामखोरांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी याकरिता चर्चा करण्यात आली. यावेळी अभाविप महिला आघाडी अध्यक्षा तथा न. प. माजी आरोग्य सभापती सौ. वर्षा शेडमाके, परिषदेच्या सल्लागार तथा जि. प. च्या माजी समाज कल्याण सभापती सौ. रंजिताताई कोडापे, सुनीताताई मडावी, जुमनाके आदी उपस्थित होते.