आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते केक कापून बाबासाहेबांची जयंती साजरी

77

– जयंतीनिमित्त आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिल्या समस्त जनतेला शुभेच्छा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथील स्थानिक इंदिरा गांधी चौकामध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे हस्ते केक कापून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष मनीष डोंगरे, अभिजित कोरडे, डॉ. दीप्ती कोरडे, मंगेश मामुलकर, अमोल गंधमवार, रोशन संगिडवार, अथर्व कापकर, गोलू उराडे, चेतन कुंद्रकवार यांच्यासह भीम प्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.