भाजपा स्थापना दिनी अहेरी ते आलापल्ली वीर सावरकर गौरव यात्रा

66

* माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची प्रमुख उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी : भारतीय जनता पार्टी स्थापना दिन गुरुवार, ६ एप्रिल रोजी सकाळी १० वा. माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जनसंपर्क कार्यालय, राजवाडा रोड, अहेरी समोर ध्वजारोहण करून भाजपा अहेरी तालुकातर्फे अहेरी ते आलापल्ली भव्य सावरकर गौरव यात्रा काढली जाणार आहे.

काँँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याद्वारे स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वारंवार चुकीची टिप्पणी करून त्यांचे मुद्दामहून अपमान केले जात आहे, यांच्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्र राज्यात भाजपा – शिवसेना महायुतीतर्फे असे सावरकर गौरव यात्रा काढली जात असून अहेरी ते आलापल्लीपर्यंत निघणाऱ्या भव्य गौरव यात्रेत राष्ट्रभक्त जनतेने तसेच भाजपा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री यांनी केले आहे.